देश >> बातम्या RSS

कोबाद गांधी यांच्या 'नार्कोस' स्थगिती
पीटीआय
Friday, November 06th, 2009 AT 12:11 AM
नवी दिल्ली - नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या कोबाद गांधी यांची नार्को चाचणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना अटकाव केला आहे. नार्को चाचणीस परवानगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयास न्यायाधीश इंद्रमीत कौर यांनी आज स्थगिती दिली.

नार्को चाचणी घटनात्मकदृष्ट्या वैध आहे किंवा नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आरोपीवर नार्को चाचणी करण्याची सक्ती करता येणार नाही, असा युक्तिवाद गांधी यांच्या वकिलांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य मानला.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून कोबाद गांधी यांना 20 सप्टेंबरला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. तापासत ते महत्त्वाची माहिती दडवत असल्याचे सांगत पोलिसांनी गांधी यांच्या नार्को चाचणीस परवानगी देण्याची विनंती केली होती. सत्र न्यायालयाने 31 तारखेस या चाचणीला परवानगी दिली होती. त्याला गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

वाचकांच्या प्रतिक्रिया