देश >> बातम्या RSS

आरोग्य सचिवांनाही 'स्वाइन फ्लू'ची बाधा
सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, November 06th, 2009 AT 12:11 AM
अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी "स्वाइन फ्लू'च्या आजारातून नुकतेच कुठे बरे होत नाही, तोच राज्याचे मुख्य आरोग्य सचिव रवी सक्‍सेना यांना "एच1एन1'ची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. राज्याच्या आरोग्य आयुक्तांनाही "स्वाइन फ्लू' झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सक्‍सेना यांना "स्वाइन फ्लू' झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तर आरोग्य आयुक्त मुकेश पुरीही सध्या तापाने आजारी आहेत. पुरी काही दिवसांपूर्वी सक्‍सेना यांच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. "एच1एन1'च्या निदानापूर्वी सक्‍सेना यांना सचिवालयात दहापेक्षा अधिक अधिकारी भेटल्याचेही सांगितले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे. सक्‍सेना यांना भेटलेल्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यातील संशयितांना "टॅमिफ्लू'ची औषधे देण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यातील "स्वाइन फ्लू' बळींचा आकडा 40 झाला आहे, तर आतापर्यंत 288 जणांना "एच1एन1'ची बाधा झाली आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया