पुणे >> बातम्या RSS

विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक वस्तूंचा खजिना पाहण्याची सुवर्ण संधी!
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 06th, 2009 AT 12:11 AM
पुणे - भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने 6, 7 व 8 नोव्हेंबर 2009 रोजी प्राचीन काळातील ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन इतिहास संशोधन मंडळ (भरत नाट्य मंदिराच्या बाजूला) येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये "सकाळ माध्यम समूहा'च्या "एनआयई' व "यंग बझ' या उपक्रमातील प्रथम येणाऱ्या 500 सभासदांना प्रवेश मोफत असणार आहे. ऐतिहासिक काळातील विविध वस्तू, नाणी, शिवकालीन पत्रे, विविध प्रकारचे पोशाख; तसेच सन 1380 मधील प्रकाशित पुस्तके, सन 1842 पासूनची पुस्तके यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे.

बदलत्या काळानुसार कालबाह्य झालेल्या वस्तूंच्या माध्यमातून इतिहासातील प्रेरणादायी त्याचप्रमाणे त्या काळातील कला, संस्कृती, तंत्रज्ञान याची माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मोडी लिपीतील लग्नपत्रिका, प्राचीन व अर्वाचिन काळातील कागदपत्रे, प्राप्तिकराची जुनी कागदपत्रे, पोस्टकार्डस, टेलिग्राफच्या जुन्या पावत्या या गोष्टीही पाहावयास मिळणार आहेत. इतिहासतज्ज्ञ मंदार लवाटे, पांडुरंग बलकवडे व डॉ. अनुराधा कुलकर्णी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन वरील तीनही दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत पाहावयास मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9850991101, 9850847054.ड

ओळखपत्र आवश्‍यक

पुण्यातील एनआयईच्या सर्व सहभागी शाळांतील सभासदांना केवळ प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वानुसार शनिवार व रविवार या दिवशी मोफत उपलब्ध असणार आहे. यासाठी सोबत ओळखपत्र आवश्‍यक असणार आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया