देश >> बातम्या RSS

तमिळनाडूमध्ये पावसाचे दहा बळी
यूएनआय
Thursday, November 05th, 2009 AT 6:11 PM
चेन्नई - तमिळनाडूत किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात मुसळधार पावसाने दहा जणांचा बळी गेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्या भागात येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.

चेन्नई, तसेच आसपासच्या जिल्ह्यांत काल दुपारपासूनच संततधार सुरू होती. मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया