रांची - झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डात हलविण्यात आले आहे. हवाला व्यवहार आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याकडून कोडा यांची चौकशी सुरू आहे.
चौकशीच्यावेळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कोडा यांना रुग्णालयातून सोडण्यापूर्वी आम्हाला कळवावे, अशी सूचना प्राप्तिकर विभागाने आणि अमलबजावणी संचालनालयाने रुग्णालयाकडे केली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पी. डी. सिन्हा यांनी ही माहिती दिली.