देश >> बातम्या RSS

येडियुरप्पा यांनी फेटाळली नेतृत्त्व बदलाची शक्‍यता
पीटीआय
Thursday, November 05th, 2009 AT 11:11 AM
नवी दिल्ली - कर्नाटकात नेतृत्त्व बदलाची कोणतीही शक्‍यता नसल्याचे तेथील मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दूरचित्रवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नेतृत्त्व बदलाची शक्‍यता फेटाळून लावली.

कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे नेते जर्नादन रेड्डी आणि करुणाकर रेड्डी यांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंडाचा झेडा फडकावल्यानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी सुषमा स्वराज यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत. येडियुरप्पा बुधवारी रात्री येथे दाखल झाले. ते लालकृष्ण अडवानी आणि राजनाथसिंह यांची गुरुवारी भेट घेणार आहेत.

राज्याच्या हितासाठी आणि निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी कोणाबरोबरही चर्चा करण्याची तयारी असल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले. केंद्रीय नेतृत्त्व जो कोणता निर्णय घेईल, तोच अंतिम असेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेल्या रेड्डी बंधूंची भेट घेण्याचा मी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचकांच्या प्रतिक्रिया