देश >> बातम्या RSS

तीन नक्षलवाद्यांना बिहारमध्ये अटक
पीटीआय
Wednesday, November 04th, 2009 AT 9:11 PM
मुंगेर (बिहार) - बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाटण या गावात नक्षलवादी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक करण्यात आले. नक्षलवाद्यांकडून दोन पिस्तुले, फ्यूज वायर असे साहित्य जप्त करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीधर मंडल यांनी सांगितले.

वाचकांच्या प्रतिक्रिया