पश्चिम महाराष्ट्र >> कोल्हापूर RSS

शुक्रवारपासून 'सकाळ'चा नववर्ष धमाका
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 03rd, 2009 AT 10:11 PM
कोल्हापूर - तब्बल दहा लाखांच्या सोन्याचे पहिले बक्षीस, दहा फ्रिज, तितकेच मोबाईल सेटस्‌ आणि आठ हजार आकर्षक भेटवस्तू असा नववर्षाचा धमाका घेऊन "सकाळ' येत आहे, येत्या शुक्रवारपासून. ही योजना साऱ्या महाराष्ट्रासाठी नसून फक्त कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातील वाचकांसाठीच आहे. नववर्षाचा धमाक्‍याद्वारे "सकाळ' ज्ञान, मनोरंजनाच्या खजिन्यासह बक्षिसांची लयलूट करण्याची संधी वाचकांना देत आहे.

"सकाळ' म्हणजे विश्‍वासार्हता आणि विश्‍वासार्हता म्हणजे "सकाळ' असे जणू समिकरणच झाले आहे. कारण अनेक वर्षांपासून "सकाळ' वाचकांच्या विश्‍वासाच्या पसंतीला पूर्णपणे उतरला आहे. योजनेच्या निकालात विश्‍वासार्हता हे "सकाळ'च्या कोणत्याही योजनेचे, उपक्रमाचे खास वैशिष्ट्य. त्यामुळेच ही योजनाही सोन्यासारखीच मौल्यवान, स्वच्छ व शुध्द आहे.

आघाडीचे दैनिक म्हणून महाराष्ट्रभर ख्याती असलेल्या "सकाळ'ची साप्ताहिक सकाळ, ऍग्रोवन, तनिष्का, प्रिमिअर ही प्रकाशने घराघरात लोकप्रिय आहेत. "सकाळ' वृत्तपत्र समूहाची बालकुमार चित्रकला स्पर्धा तर देशातील अशा प्रकारची एकमेव योजना आहे.

अशा "सकाळ'ची नववर्ष धमाका फक्त पाचच जिल्ह्यांसाठी आहे. योजनेचा कालावधी 6 नोव्हेंबर 2009 ते 5 मार्च 2010 असा आहे. योजनेसाठी 6 नोव्हेंबरपासून एकूण 120 कूपन्स क्रमशः प्रसिध्द होतील. तीच कूपन अधिकृत असतील. त्यापैकी किमान 100 कूपन्स आवश्‍यक आहेत. कात्रणे चिकटविण्याचा तक्ता "सकाळ'मध्ये 14 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केला जाईल. त्याचप्रमाणे प्रवेशिका पाठविण्याचा तपशील 6 मार्च 2010 रोजी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या प्रवेशिकेत दिला जाईल.

कोणतेही प्रश्‍न नाहीत, उत्तरासाठी डोके खाजविण्याचा त्रास नाही. अशी ही अगदी सोपी योजना आहे. "कुटुंबातील सर्वांसाठी' अशी "सकाळ'ची ख्याती असल्याने "नववर्ष धमाका' योजनाही सुटसुटीत आहे. सर्व वयोगटातील वाचकांसाठी ही योजना खुली राहील.

असा आहे "नववर्षाचा धमाका'-

या योजनेचे पहिले बक्षिस दहा लाखांचे सोने (विभागून) आहे. दुसरे बक्षिस फ्रिज आहे. दहा विजेत्यांना फ्रिज दिले जातील. तिसऱ्या क्रमांकाच्या दहा विजेत्यांना मोबाईल हॅंन्डसेट बक्षिस मिळेल. चौथे बक्षिस तब्बल 8000 विजेत्यांना मिळेल. त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील. म्हणूनच ज्ञानाबरोबर या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी शुक्रवारपासून "सकाळ' वाचायलाच हवा.

योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क -

महेश डाकरे - 9881129253

अमोल यादव - 9881129254

युवराज धोंगडे - 9881129224

सचिन कासार - 9850844280

सरदार राऊत - 9922507180

वाचकांच्या प्रतिक्रिया