देश >> बातम्या RSS

निमलष्करी दलात नोकरीची रुखसानाची मागणी
पीटीआय
Tuesday, November 03rd, 2009 AT 7:11 PM
नवी दिल्ली - निमलष्करी दलात कायम नोकरी देण्यात यावी, अशी मागणी रुखसाना कौसर हिने केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाला धोका असल्याने राजौरीतून जम्मूत हलविण्याची मागणीही तिने केली आहे.

रुखसानाने दहशतवाद्यांशी मुकाबला करून एकाला ठार मारले होते. या धाडसाबद्दल तिचा आज दिल्लीत दहशतवादविरोधी मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ती पत्रकारांशी बोलत होती. रुखसाना हिला कालच विशेष पोलिस अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तिचा भाऊ आणि काकांचीही याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, ""मला केंद्र सरकारमध्ये नोकरी हवी आहे. विशेषतः केंद्रीय राखीव पोलिस दलात नोकरी मिळावी. मी देशासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. देशासाठी कुठेही नोकरी करण्यास तयार आहे. मात्र मला केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपाची नोकरी मिळावी.'' मुलांना कोणत्याही भीतीला सामोरे जाता यावे व दहशतवाद्यांशी मुकाबला करता यावा, यासाठी त्यांना शाळेत लष्करी शिक्षण सक्तीचे करावे, असेही ती म्हणाली.

वाचकांच्या प्रतिक्रिया