महाराष्ट्र >> बातम्या RSS

'सकाळ' एसएमएस सेवा देणार मोबाईलवरून ताज्या घडामोडी
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, November 02nd, 2009 AT 12:11 AM
पुणे - ताज्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत सर्वप्रथम पोचविण्याच्या उद्देशाने 'सकाळ'ने आता 'एसएमएस न्यूज अपडेट' सेवेच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मोबाईलच्या माध्यमातून अशी राज्यव्यापी सेवा देणारा 'सकाळ' हा पहिलाच माध्यम समूह ठरणार आहे. एसएमएस सेवेच्या नावनोंदणी सोमवारपासून (ता. 2 नोव्हेंबर) सुरू होत आहे.

घटना-घडामोडींचा उलगडा होत असतानाच त्याच्या 'ब्रेकिंग न्यूज' दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचतात; परंतु नोकरी-व्यवसाय किंवा अन्य कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या अनेकांपर्यंत या बातम्या ताजेपणाने पोचत नाहीत. 'माहिती-स्फोटा'च्या युगात वावरत असूनही आपला पेशा, व्यवसाय यासंबंधीचे काही निर्णय घेण्यास उपयुक्त ठरू शकेल, असे विषय त्यांच्यापर्यंत हवे तेव्हा, हवे तिथे मिळत नाहीत.

'सकाळ' ही संधी आपल्याला देत आहे. राज्यभरातील गावोगावच्या अडीच हजारांहून अधिक बातमीदारांच्या विशालकाय संपर्क यंत्रणेतून आम्ही आपल्याला हवी ती प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत ताजेपणाने पोचविणार आहोत. राज्याच्या प्रत्येक शहरातील आणि असंख्य गावांमधील एक लाखाहून अधिक नागरिकांनी या सेवेसंदर्भात नावनोंदणीसाठी आमच्याकडे याआधीच प्राथमिक माहिती पाठविली आहे. छाननी केल्यानंतर त्यांच्यापैकी 53 हजार ग्राहकांना आम्ही ही सेवा मोफत देण्यास सुरवातही केली आहे; परंतु ही माहिती भरून देणारे किंवा अद्याप भरून न देणारे अशा सर्वांसाठीच आता आम्ही विस्तारित सेवेचा पर्याय घेऊन येत आहोत.

सध्याची सेवा मर्यादित स्वरूपाची; दिवसभरातील दोन महत्त्वाच्या घडामोडींची ताजेपणाने माहिती देणारी आहे. ती यापुढे मर्यादित कालावधीसाठीच सध्याच्या स्वरूपात सुरू राहणार आहे. मात्र, ज्यांना अधिक ताज्या घडामोडींची; विशेषतः आपल्या भागातील घडामोडींचीही माहिती घेण्यात रस आहे, त्यांना आम्ही रोज पाच अपडेट देणारी सशुल्क सेवा सुरू करीत आहोत. त्यासाठीची नावनोंदणी सोमवारपासून (ता. 2 नोव्हेंबर) सुरू होत असून, प्रत्यक्ष सेवा 1 डिसेंबरपासून सुरू होईल.

राज्यातील बहुसंख्य खासदार-आमदार, अन्य महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती आणि सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा अन्यही क्षेत्रांतील काही अतिमहत्त्वाच्या अशा एक हजारांहून अधिक व्यक्तींसाठी अशी सेवा "सकाळ' सध्या देत आहे. तशीच सेवा आता सर्वांसाठी खुली केली जात आहे.

ही सेवा फक्त ताज्या घडामोडींची माहिती देणारी असून, त्यातून कोणताही प्रचारी किंवा जाहिरातविषयक मजकूर आपल्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता 'सकाळ' घेणार आहे.

या सेवेसाठीची नावनोंदणी खालील ठिकाणी करता येईल (कंसात संबंधित ठिकाणी नावनोंदणी करण्यासाठी संपर्काचा क्रमांक) -

पुणे (9011017825), पिंपरी-चिंचवड (9922419027), सातारा (9881133092), नगर (9881099335).

मुंबई (9821901913)

कोल्हापूर (9881099119)

नाशिक (9822567708)

जळगाव (9881136033)

औरंगाबाद (9850842117)

नागपूर (9881099193)

सोलापूर (9881718826)

सेवेची वैशिष्ट्ये -

-केवळ 15 पैशांना एक 'एसएमएस' या दराने आकारलेल्या वार्षिक वा अर्धवार्षिक शुल्काच्या मोबदल्यात दिवसभरात किमान पाच प्रमुख 'ब्रेकिंग न्यूज'

-राष्ट्रीय व राज्यस्तरीय महत्त्वाच्या घडामोडींबरोबरच आपल्या विभागातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडींचेही अपडेट

-राज्यभरातील अडीच हजारांहून अधिक बातमीदारांमार्फत येणाऱ्या माहितीच्या आधारे राज्यव्यापी असे अपडेट देणारी पहिलीच "एसएमएस' सेवा

-घटना घडताक्षणी ती ग्राहकांपर्यंत पोचविणारी (रिअल टाइम सर्व्हिस) अद्ययावत यंत्रणा

सेवेचे स्वरूप -

-अर्धवार्षिक 199 रुपये किंवा वार्षिक 299 रुपये शुल्क (सेवाकरासह)

-किमान पाचशे मोबाईलधारकांच्या समूहाला एकत्रित नोंदणीसाठी वार्षिक शुल्कात 50 रुपयांची सवलत; किमान एक हजाराच्या समूहासाठी ही सवलत 100 रुपयांची.

-"सकाळ'च्या कोणत्याही कार्यालयात किंवा वितरण प्रतिनिधीकडे केवळ एक अर्ज भरून वर्गणीदार होण्याची सोय

-25 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी 1 डिसेंबरपासून आणि त्यानंतर नोंदणी केल्यास नोंदणीच्या पाचव्या दिवसापासून सेवा सुरू होणार

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On November 02nd 7:11 PM, Shivram Gopal Vaidya said:

"सकाळ" आणि बाकीची वर्तमानपत्रे यात हाच प्रमुख फरक आहे.उगाच नाही आम्ही "सकाळ"ला आमच्या कुटुंबापैकी एक मानत. We Love You "SAKAL" !! Keep It Up !!

 

On November 02nd 1:11 PM, Nitin said:

Good News.But what about existing sms subscriber. Presently I am getting sakal sms with some times advertisements also. If you stop this service the advertisements should also stop. Or keep existing free sms service with advertisement sms also.

 

On November 02nd 9:11 AM, anil said:

thank you verry Much sakal news.

 

On November 02nd 9:11 AM, PC said:

Very Good News... All The Best ... And Keep it Up... I Love Sakal

 

On November 02nd 8:11 AM, satish said:

thaks sakal,this is best news of today's sakal

 

On November 02nd 6:11 AM, Arvind said:

What a nice service going to be provided by Sakal on mobile.Those with busy schedules can get updated news on mobile.Day by day sakal brings new ideas to give readers news instantly.This is becuase of energitic staff sakal and people have been loving sakal many decays.Three cheers. Hats off sakal.

 
1