देश >> बातम्या RSS

एअर इंडियाच्या विमानाचे दिल्लीत अचानक लॅंडिंग
पीटीआय
Saturday, October 31st, 2009 AT 2:10 PM

नवी दिल्ली - मुंबईतून शांघायला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आज (शनिवारी) अचानक दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७२ प्रवाशांना घेऊन शांघायला निघालेल्या या विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (एटीसी) इमर्जन्सी लॅंडिगची परवानगी मागितली. कक्षाने विमानतळावरील रुग्णवाहिका तसेच अन्य तातडीच्या सेवांना सावधानतेचा इशारा दिला. त्यानंतर एअरबस - ए ३३० हे विमान उतरविण्यात आले.

प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवून देण्यात आले असून, ते शांघायकडे रवाना झाले आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On October 31st 4:10 PM, Punekar said:

in todays Pune mirror also saw bad news AI service. 1 passager found tooth in his meal while travelling via Air India's domestic flight. Fligh attendances denied to give acknowledgement of this incident. How pathetic? Air India is famous like "cheap" airlines company service wise.

 
1