पश्चिम महाराष्ट्र >> फोटो RSS

उपमुख्यमंत्र्यांची विठूरायाकडे शक्ती-बुद्धीची याचना
अभय जोशी
Thursday, October 29th, 2009 AT 3:10 PM

पंढरपूर येथे गुरुवारी पहाटे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली.त्याप्रसंगी आमदार एकनाथ खडसे (छायाचित्र- नागेश दंतकाळे, सोलापूर)

पंढरपूर - विठूराया, यापुढच्या काळात देखील महाराष्ट्राची वेगाने प्रगती व्हावी. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शक्ती आणि बुध्दी दे अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

दरम्यान आज कार्तिकी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीत स्नान करून दिंड्या पताकांसह हरिनामाचा जयघोष करीत नगरप्रदक्षिणा केली. टाळ मृंदंगाच्या गजरामुळे अवघी पंढरी दुमदुमून गेली होती.

कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा श्री.भुजबळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी त्यांचे पुत्र, आमदार पंकज भुजबळ, पुतणे खासदार समीर भुजबळ व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कर्नाटकातील बाळू दत्तू भोसले (वय ४९ रा.गोकाक जि.बेळगाव) आणि त्यांची पत्नी प्रमिला भोसले या वारकरी दांम्पत्यास मिळाला.

काल सायंकाळी श्री.भुजबळ हे आपल्या कुटुंबियांसह येथे आले. आज पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि नंतर श्री रुक्‍मिणीमातेची त्यांच्या हस्ते यथासांग पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष ऍड.शशिकांत पागे यांनी श्री.भुजबळ यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुखुमाई हे देशाचे आराध्य दैवत आहे. पंढरपूर येथे दरवर्षी लाखो वारकरी येत असतात या वारकऱ्यांना चांगल्या सोईसुविधा मिळाव्यात यासाठी श्री संत तुकाराम महाराज चतुःजन्मशताब्दीच्या निमित्ताने शासनाने मंजूर केलेल्या निधीतून वेळेत कामे पूर्ण करण्यात येतील. पंढरपूर आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना ही केली आहे.त्यामुळे या परिसराचा विकास होईल. पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल असे सांगून ते म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी , महागाई आणि बेरोजगारांच्या समस्या सुटाव्यात. सामान्य जनतेचे धोरण ठरविण्याचे काम विधानसभेचे सदस्य करतात. त्यांना युक्ती आणि शक्ती देऊन चांगले काम घडावे असे साकडे आपण आज घातले आहे.

वनमंत्री श्री.पाचपुते म्हणाले, पंढरपूर ही जगातील अध्यात्मनगरी व्हावी. भावभक्तीचा प्रवाह या ठिकाणी सतत वाहतो. भक्तीचा मळा फुलविण्याचे काम वारकरी करतात. या अध्यात्मनगरीत भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेले बाळू भोसले आणि त्यांच्या पत्नी प्रमिला भोसले हे गेली पंचवीस वर्षे पंढरीची वारी करीत आहेत. भोसले हे भांड्याचे व्यापारी आहेत. विठ्ठलाच्या दर्शनामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते. आज विठ्ठलाच्या महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

वारकरी प्रतिनिधी बाळू दत्तू भोसले आणि त्यांच्या पत्नी प्रमिला भोसले यांना एस.टी महामंडळाच्या वतीने एक वर्षाचा मोफत प्रवासाचा पास श्री.भुजबळ यांच्या हस्ते आणि एसटी.महामंडळाचे पुण्याचे प्रादेशिक व्यवस्थापक आर.सी.पाटील, विभाग नियंत्रक डी.बी.माने, वरिष्ठ आगारप्रमुख श्री.हांडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उल्हास पवार, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ.जगदीश पाटील, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य बाळासाहेब बडवे, प्रा.जयवंत भंडारे,कार्यकारी अधिकारी गोपीचंद कमद आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी नदीत स्नान करून मोठ्या भक्तीभावाने नगप्रदक्षिणा केली. परंपरेप्रमाणे दुपारी रथयात्रेचा सोहळा देखील उत्साहात पार पडला.

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On October 29th 4:10 PM, Ashish said:

Pandurang Hari, tuch ata maharashstrala tari

 

On October 29th 3:10 PM, mi marathi said:

barobar aahe.. je naahi te maagav laagat....

 

On October 29th 3:10 PM, shirish kane said:

राजकारणी लोकांना देव फक्त स्वत:साठी हवा आहे. बाकीच्यांचे काहीही होवो. ही परिस्थिती बदलली पाहिजे.

 

On October 29th 3:10 PM, Mangesh Awasekar said:

या नेते मंडळींना महापूजेचे ढोंग करून काय साध्य करायचे असते ? निवडणुकीच्या वेळी मात्र विकासाचा ढोल बडवत असतात आणि नंतर मात्र विकासाच्या नावाने बोंब. भुजबळ फक्त शिर्डी-येवला-नाशिकचाच विकास करत बसतील.पंढरपूरच्या विकासासाठी नुसत्या घोषणा करतील हे मंत्री लोक आणि फुटकी कवडीहि देणार नाहीत पंढरपूरला. पंढरपू

 

On October 29th 3:10 PM, babu mapari said:

राज्यातील विजेचा, बेरोजगारीचा व महागाईचा प्रश्‍न सुटावा, जनता सुखात राहावी यासाठी काम करण्याची शक्ती व बुद्धी द्यावी असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे

 

On October 29th 1:10 PM, hari said:

Hope atleast Mantriji would have asked for better roads leading to Pandharpur !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! which is in his scope

 

On October 29th 1:10 PM, Tambarwade said:

श्री विठ्ठल बुद्धी deto pan you tacha waper karne awasak ahe hich amchi ichha

 

On October 29th 1:10 PM, Ashwini said:

this is a right but for that tray today.

 

On October 29th 10:10 AM, Dattu said:

राज्यातील विजेचा, बेरोजगारीचा व महागाईचा प्रश्‍न सुटावा, जनता सुखात राहावी यासाठी काम करण्याची शक्ती व बुद्धी द्यावी असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले?????????????????????????????????????????????

 
1