देश >> बातम्या RSS

चोरीस गेलेले 50 कोटींचे शिवलिंग हस्तगत; दोघांना अटक
यूएनआय
Monday, October 26th, 2009 AT 6:10 PM
चेन्नई  - नागापट्टीनम येथील थिरुथुराइपुंडी येथील नागापट्टीनम मंदिरातून फेब्रुवारी महिन्यात चोरीस गेलेल्या शिवलिंगाचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. या शिवलिंगाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत पन्नास कोटी रुपये आहे.

येथील राज्य गुन्हेअन्वेषण खात्याच्या उपायुक्‍त श्रीमती थिलकवथी यांनी सांगितले, की आठ महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या शिवलिंगाचा पोलिस शोध घेत होते. याप्रकरणी पोदुकोट्टाई येथील रमेश (वय 30) आणि वालंगईमन येथील सेन्थील (वय 29) यांना चेन्नईतील बसस्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हे किमती शिवलिंगही जप्त करण्यात आले आहे. बसस्थानकावर दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या दोघांची चौकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या रिकाम्या गॅस सिलिंडरची तपासणी केली असता त्यामध्ये हे शिवलिंग दडवलेले आढळून आले. या शिवलिंगाविषयी अधिक चौकशी केली असता त्यांनी ते आठ महिन्यांपूर्वी थिरुथुराइपुंडी येथील मंदिरातून चोरल्याची कबुली दिली. हे शिवलिंग मंदिराच्या व्यवस्थापन समितीने ओळखले आहे.

चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेले दोघेही कुख्यात गुंड असून, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तिरुचिरापल्ली येथे पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी रमेश याला शिक्षा झाली होती, तर सिंथल याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. या मूर्तीचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने एक पथकही नियुक्त केले होते.

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On October 26th 10:10 PM, suresh said:

very good sir.

 

On October 26th 10:10 PM, amrutha said:

very good.

 
1