देश >> बातम्या RSS

'जी-मेल'ची लोकप्रियता भारतात सर्वांधिक
पीटीआय
Wednesday, October 14th, 2009 AT 12:10 AM
नवी दिल्ली - "गूगल'ची "जी-मेल' ही मोफत "ई-मेल'सुविधा भारतात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. पहिल्या क्रमांकाच्या या स्पर्धेत "जी-मेल'ने "याहू'ला मागे टाकले आहे. "विझिसेन्स'ने ही पाहणी केली होती.

"जी-मेल'चे भारतातील ग्राहकांची संख्या एक कोटी 80 लाखांवर पोचली असून, "याहू मेल'चे एक कोटी 68 लाख ग्राहक आहेत. या वर्षी ऑगस्टपर्यंतची ही आकडेवारी असून "याहू'चे ग्राहक आठ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. या वर्षी ऑगस्टपासून "जी-मेल'चे ग्राहक दरमहा तीन टक्‍क्‍यांनी वाढत आहेत. "मायक्रोसॉफ्ट'च्या "विंडोज लाईव्ह मेल'लाही अनेकांनी पसंती दिली असून या ऑगस्टपासून त्यांच्या ग्राहकसंख्येत आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. "जी-मेल', "याहू मेल' पाठोपाठ "रेडिफ मेल'चा क्रमांक असून त्यांचे भारतात 62.5 लाख ग्राहक आहेत.

जागतिक पातळीवर मात्र थोडे वेगळे चित्र आहे. "याहू मेल'कडून प्रथम क्रमांक हिसकावून घेण्यासाठी "जी-मेल'ला थोडी वाट पहावी लागेल. तसेच "विंडोज लाईव्ह मेल' जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतही "जी-मेल' लोकप्रिय होत आहे. "याहू' आणि "विंडोज'ने तातडीने पावले उचलली नाहीत, तर "जी-मेल' त्यांची जागा घेईल, असा अंदाज पाहणीत व्यक्त केला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच "याहू'ने भारतातील सर्व राष्ट्रीय वर्तमानपत्रांत पूर्णपान जाहिरात देऊन नव्या बदलांची दिलेली माहिती हा नवे ग्राहक मिळविण्याचाच प्रकार होता.

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On October 14th 12:10 PM, kedar said:

Gmail is BEST. It will definitely grab 1st rank from Yahoo shortly.

 

On October 14th 12:10 AM, mandar said:

yahoo chi service bhangar aahe.vishes mhanje SPAM mail khup yetat i yahoo messenger varun voice call lagala nahi tari paise cut hotat.PC to PC call nit hot nahit.Gmail changale aahe pan tyani webcam suvidha thevavi gtalk var

 
1