महाराष्ट्र >> बातम्या RSS

मुंबईत पावसाच्या सरींवर सरी!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 04th, 2009 AT 6:07 PM

गेल्या महिन्यापासून मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर शनिवारी मुंबईत मुसळधार पावसाला सुरवात झाली. परळ येथे पाणी साठल्याने वाहतुकीची कोंडी झाली.(प्रशांत चव्हाण, सकाळ छायाचित्रसेवा)

मुंबई - महाराष्ट्रातील विविध भागांत ओढवलेले पाणीकपातीचे संकट, खोळंबलेल्या पेरण्या यासर्व पार्श्‍वभूमीवर मुंबईसह राज्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात.

मुंबईत शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर जास्त असल्याने हिंदमाता, दादर अशा सखल भागांत पाणी साठण्यास सुरवात झाली आहे. पाणी साठलेल्या भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पावसामुळे रेल्वे रुळांवरही पाणी साठले असून, मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तानसा, मोडकसागर तलावांच्या क्षेत्रात पावसाला सुरवात झाली आहे.

कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत गेले तीन-चार दिवस संततधार सुरूच आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात आतापर्यंत पावसामुळे एक बळी गेला आहे. ठिकठिकाणी दरडी तसेच झाडे कोसळून लाखो रुपयांची हानी झाली आहे. शनिवार सकाळपर्यंत जिल्ह्यात कोठेही गंभीर पूरस्थिती नव्हती. सिंधुदूर्गमध्ये गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद सावंतवाडी तालुक्‍यात १८४ मिमी इतकी झाली. पावसाचा कोकण रेल्वेवर कोणताही परिणाम झाला नसून, कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

राज्याच्या अन्य भागांत कमी-अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी पावसाला सुरवात झाली असून, येत्या सात जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली. बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे जुलैत निश्‍चितपणे राज्यात वरुणराजाची कृपा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On July 04th 7:07 PM, sanjay sangar said:

pous hawa sarvatra

 

On July 04th 6:07 PM, Pradeep Thakare said:

Yes offcourse , everybody is Happpy. ya varshi bharpur paus padu de.

 

On July 04th 6:07 PM, Uttam said:

Good!!!! No rains in Pune. all Punekar's are waiting for it.

 

On July 04th 6:07 PM, Vilas said:

Its very good news atleast rain has started as everyone is waiting for rain.Because no one can servive without rain.....................

 

On July 04th 5:07 PM, vru said:

god is great

 

On July 04th 4:07 PM, ASLAM ATTAR, MOMINPURA, PUNE said:

ITS ALL HAPPEN BECAUSE OF GOD ONLY.

 

On July 04th 3:07 PM, SANJAY VEER THANE said:

ये रे ये रे पाउसा very very happy

 

On July 04th 3:07 PM, avinash dolare said:

pavasacha jore asach kayam rahoo de

 

On July 04th 3:07 PM, ANIRUDH GORE said:

very very happy

 

On July 04th 3:07 PM, vinayak said:

ya its good that its raining heavily in mumbai and surrounding areas, but now its challenge for MCGM to take care of mumbai, and i hope they will accpet this challege and work on it. it should not happend like 200 5 again, please

 

On July 04th 3:07 PM, vinayak said:

ya its good that its raining heavily in mumbai and surrounding areas, but now its challenge for MCGM to take care of mumbai, and i hope they will accpet this challege and work on it. it should not happend like 200 5 again, please

 

On July 04th 3:07 PM, Sudhir said:

megh aale,megh barsale ! man jhale ole,man sukhavale !

 

On July 04th 3:07 PM, manaswee said:

when rain will coming in Pune

 

On July 04th 2:07 PM, shashikant said:

ये रे ये रे पाउसा

 

On July 04th 1:07 PM, parag said:

very happy

 
1