मुंबई - रेल्वे प्रवासी आणि मालगाडी भाड्यात कोणतीही नवीन वाढ न करता "नॉन स्टॉप' बजेट सादर करणाऱ्या रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
एकीकडे मुंबईत परराज्यातून येणाऱ्या गाड्यांनी संख्या वाढवताना उपनगरीय रेल्वे वाहतुकीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आस लावून बसलेल्या ७५ लाख प्रवाशांची अर्थसंकल्पाने घोर निराशा झाली आहे.
मुंबईची "लाईफ लाईन' असलेल्या लोकलचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नसल्याने मुंबईकर ममतांवर नाराज झाले आहेत. अर्थसंकल्पात लोकलसाठी नवीन सुविधा अपेक्षित होत्या.