उत्तर महाराष्ट्र >> नाशिक RSS

ऍड. रावसाहेब शिंदेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 13th, 2009 AT 11:06 PM
नाशिक - रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. रावसाहेब शिंदे यांच्या "प्रश्‍न आहे मूल्यांचा' या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (ता. 14) दुपारी साडेचारला कृषी व जलसंधारणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम अध्यक्षस्थानी असतील. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आमदार डॉ. वसंतराव पवार, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी प्रमुख पाहुणे असतील. ऍड. शिंदे यांची "शिक्षण आणि समाज', "चारित्र्य भावलेली माणसे' ही वैचारिक लेखन असलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच "ध्यासपर्व' हे आत्मकथनही प्रसिद्ध आहे. पाडळी (ता. सिन्नर) येथील ऍड. शिंदे यांच्या पुस्तकांची प्रकाशने यापूर्वी श्रीरामपूर, पुणे, दिल्ली आदी ठिकाणी झाली आहेत. "प्रश्‍न आहे मूल्यांचा' या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे होत असल्याने या कार्यक्रमास नाशिक, नगर जिल्ह्यातून त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ऍड. भगीरथ शिंदे यांनी केले आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया